Today Horoscope 15 May 2026: आज १५ मे २०२६ रोजी ग्रहांचा राजा सूर्य यांनी गोचर केले आहे. या गोचराचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींवर दिसू लागला आहे.
आज सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी सूर्याचे हे गोचर झाले. आता जवळपास एक महिना सूर्य वृषभ राशीतच राहणार आहेत. या काळात काही राशींचे नशीब जोरदार साथ देणार असून त्यांना अनेक क्षेत्रांत फायदा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आजपासून नेमक्या कोणत्या ५ राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे.
मेष राशी (Today Mesh Rashibhavishya)
आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही मोठे निर्णय स्वतः घेऊ शकता. तसेच धनलाभात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीबाबतही सकारात्मक बातमी मिळू शकते.
मिथुन राशी (Today Mithun Rashibhavishya)
जीवनसाथीसोबतचे संबंध सुधारतील आणि फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाचा ताण कमी झाल्यासारखे वाटेल. तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठी लांबचा प्रवास फायदेशीर ठरू शकतो.
कन्या राशी (Today Kanya Rashibhavishya)
विवाहित लोकांचे जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल आणि एकत्र फिरायला जाण्याची संधी मिळेल. स्वतःचे दुकान असलेल्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. शरीरातील वेदनांपासूनही आराम मिळू शकतो.
वृश्चिक राशी (Today Vrishchik Rashibhavishya)
जोडीदारासोबत सुरू असलेले वाद मिटू शकतात. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारण्याची संधी मिळेल. दुकानदारांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
मकर राशी (Today Makar Rashibhavishya)
नोकरी करणाऱ्यांच्या कामामुळे बॉस खुश राहतील. पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. या काळात मालमत्तेशी संबंधित मोठा व्यवहार होऊन चांगला धनलाभ मिळू शकतो. घरातील वातावरणही आनंदी आणि शांत राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
