Horoscope Today 16 March 2026 In Marathi : आज १६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. त्याचबरोबर शिव आणि सिद्ध योग जुळून येईल आणि धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १६ मार्च २०२६ (Daily Horoscope 16 March 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. करमणुकीचे कार्यक्रम ठरवाल. हौसेला अधिक महत्व द्याल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जपून राहावे. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल. स्त्रियांच्या ओळखीने कामे पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. तुमची समाजप्रियता वाढेल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. आवडीचे खाद्यपदार्थ खाल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड दर्शवाल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल. अंगीभूत कलेला पोषक वातावरण मिळेल. धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. भागीदाराशी एकोपा वाढवावा. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत. आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. दूरगामी विचारांना चालना द्यावी.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. बोलतांना आवेग आवरता घ्यावा. दिखाऊपणाला भुलून जाऊ नका.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

कामात अधिक जोम येईल. सुप्त कलागुणांना वाव द्यावा. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

सामुदायिक वादात अडकू नका. पारमार्थिक बळ वाढवाल. गप्पिष्ट लोकांच्यात वेळ घालवाल. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. मानसिक चंचलतेवर मात करावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर