Horoscope Today 2 July: शनी ग्रहाने बुधाच्या रेवती नक्षत्रात प्रवेश केला आहे. आज, २ जुलै रोजी सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी शनिने रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर केले आहे.

शनी ग्रह २० ऑगस्टपर्यंत रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात राहणार आहेत. त्यानंतर ते रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करतील. शनीचे हे रेवती नक्षत्र चरण गोचर ६ राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. चला, या भाग्यवान राशींविषयी जाणून घेऊया.

वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)

रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात शनीच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांच्या कमाईत वाढ होईल. उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

मिथुन राशी (Gemini Zodiac Sign)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे हे चरण नक्षत्र गोचर शुभ ठरेल. या लोकांना व्यवसायात फायदा होईल. पैशांच्या बाबतीत हा काळ चांगला राहील. शनीदेवांच्या कृपेने मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.

कन्या राशी (Virgo Zodiac Sign)

शनीच्या चरण नक्षत्र गोचरामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल. कौटुंबिक नातेसंबंधांसाठी हा काळ चांगला राहील. जोडीदारासोबतचे प्रेम अधिक वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. तुमच्यासाठी हा काळ शुभ आणि लाभदायक राहील.

तूळ राशी (Libra Zodiac Sign)

तूळ राशीच्या लोकांना शनीच्या गोचरामुळे मोठा फायदा होईल. शत्रूंवर विजय मिळेल. ज्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले नव्हते, त्यांच्यासोबतचे संबंध सुधारतील. शनीच्या गोचरामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल.

मकर राशी (Capricorn Zodiac Sign)

मकर राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा मिळू शकतो. तुमच्या धाडसात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात.

कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे चरण नक्षत्र गोचर लाभदायक ठरेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कमाईत वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)