Today horoscope 2 May 2026: चंद्र आणि मंगळ ग्रहांमध्ये २ मेच्या रात्री नवपंचम योग तयार होणार आहे. २ मेच्या रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, तर त्या वेळी मंगळ मीन राशीत असेल. म्हणजेच चंद्रापासून मंगळ पंचम भावात असेल आणि मंगळापासून चंद्र नवम भावात असेल. त्यामुळे चंद्र-मंगळ यांच्यात नवपंचम योग तयार होईल. या योगामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो, चला जाणून घेऊया त्या राशींविषयी.
वृषभ राशी (Taurus Today Horoscope)
नवपंचम योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला ठरू शकतो. मंगळ तुमच्या धैर्य आणि पराक्रमात वाढ करेल, तर चंद्र तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो. जमीन-जुमल्याशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. कुटुंबातही सकारात्मक बदल दिसून येतील.
कर्क राशी (Cancer Today Horoscope)
चंद्र-मंगळाचा नवपंचम योग तुमच्यासाठी खूपच सुखद राहील. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि नशिबाची साथ मिळेल. पंचम भावात असलेला चंद्र शिक्षणाच्या क्षेत्रात यश देईल. सरकारी क्षेत्रातून धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल.
सिंह राशी (Leo Today Horoscope)
नवपंचम योगामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असाल तर चांगली नोकरी मिळू शकते.
वृश्चिक राशी (Scorpio Today Horoscope)
नवपंचम योगामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता. करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कला क्षेत्रात मोठे यश मिळू शकते. आई-वडिलांच्या मदतीने घर किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
