Rashi Bhavishya 26 February 2026 In Marathi : आज २६ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर प्रिती योग जुळून येईल आणि मृगशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. स्वामी कृपेने तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, २६ फेब्रुवारी २०२६ (Dainik Rashi Bhavishya 26 February 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

मनाने कामे मिळवाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे. ओळखीचा फायदा होईल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

अति अपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा. समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. जोडीदाराचा निश्चय मान्य करावा लागेल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

जवळच्या प्रवासात त्रास संभवतो. क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका. कामाचा उरक वाढेल. हातातील अधिकार वापरावेत. मनोभंगाला सामोरे जावे लागू शकते.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

हातातील कामात यश येईल. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेला चांगले बळ मिळेल. कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

प्रवासात रुखरुख लागून राहील. मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा. गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. नातेवाईकांचा विरोध होवू शकतो.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

वायफळ खर्च वाढेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कोणाच्याही मदती शिवाय कामे पार पाडाल. योग्य तारतम्य बुद्धि वापरावी. प्रांजळपणे वागणे ठेवाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

उदारपणे वागणे ठेवाल. बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल. बढतीची चिन्हे दिसून येतील. घशाचे विकार होण्याची शक्यता आहे.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

स्वत:चा सत्वगुण राखाल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर