Horoscope Today 26 january 2026 In Marathi : आज २६ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर साध्य योग जुळून येईल आणि अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १२ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजता सुरु होईल ते ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल. आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २६ जानेवारी २०२६ (Today Horoscope In Marathi 26 january 2026 )

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

सहज मिळणाऱ्या गोष्टींनी हुरळून जावू नये. भावंडांचे सहकार्य मिळेल. मित्रांशी सलोखा वाढवावा. मनाची द्विधावस्था टाळण्याचा प्रयत्न करावा. जवळचा प्रवास कराल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

संयमाची जोड घ्यावी लागेल. फार काळ विचार करत बसू नका. आपल्या मतावर ठाम राहाल. घरातील कामे आवडीने पार पाडाल. किरकोळ खरेदीत वेळ घालवाल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

एकावेळी अनेक कामे हातात घेवू नयेत. आपले वेगळेपण सिध्द करावे. ठाम निर्णय घ्यावेत. कामाचा आवाका लक्षात घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

आवक-जावक यांची उजळणी करावी. गोड बोलण्यावर भर द्यावा लागेल. जबाबदाराची जाणीव ठेवाल. तब्बेतीची काळजी घ्यावी. खर्च वाढू शकतो.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

उत्साहाला आवर घालावी लागेल. कामामुळे थकवा जाणवेल. फार ताण घेवू नका. वेळ आणि काम यांची योग्य सांगड घालावी लागेल. दिरंगाई टाळावी.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

उघडपणे बोलणे टाळावे. जनविरोधापासून दूर राहावे. सामाजिक बाजू लक्षात घ्यावी. अपेक्षित लाभाचा आनंद घ्याल. झोपेची तक्रार दूर करावी.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

अधिकारी व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यावसायिक लाभाचा दिवस. नम्रपणे वागावे. दृष्टीकोन बदलून पाहावा.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

कामातील बदल जाणून घ्यावा. कार्यप्रविणता वाढीस लागेल. अति उत्साह टाळावा. अचानक धनलाभाची शक्यता. सारासार विचारला प्राधान्य द्यावे.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

चुकीचे विचार मनातून काढून टाका. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. कामातून आनंद शोधावा. गैरसमजुतीत अडकू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

गप्पांमध्ये रमून जाल. जोडीदाराच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक कराल. मुलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या. पोटाची तक्रार जाणवू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. उष्णतेचे विकार जाणवतील. अकारण चीड-चीड करू नये. फसवणुकीपासून सावध राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

काही कामे रेंगाळतील. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व गाजवाल. आपलेच म्हणणे खरे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. मनाची द्विधावस्था टाळावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर