Horoscope Today 29 May: २९ मे रोजी सकाळी मंगळ ग्रहाने शुक्राच्या स्वामित्व असलेल्या भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांनी झाले. आता १६ जूनपर्यंत मंगळ भरणी नक्षत्रातच राहणार आहे. मंगळाच्या या गोचरामुळे काही राशींना आयुष्यात खूप शुभ परिणाम मिळू शकतात. या राशींना धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या राशींविषयी.
मेष राशी (Aries Horoscope)
मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे मंगळाचे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. करिअरमध्ये चांगले बदल दिसू शकतात. काही लोकांना प्रमोशन मिळू शकते किंवा उत्पन्नात वाढ होऊ शकते. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर योग्य मार्गदर्शन मिळू शकते. तुमचा आत्मविश्वासही भरपूर वाढलेला दिसेल.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. अनोळखी स्रोतांमधूनही धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात मोठ्या भावंडांचा पाठिंबा मिळेल.
तूळ राशी (Libra Horoscope)
मंगळाच्या गोचरामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकतो. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळू शकतो. तुमची ऊर्जा वाढेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करू शकता. काही लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. काहींना सरकारी नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमच्या कामामुळे खुश होऊन कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. अडकलेली कामे मंगळाचे नक्षत्र बदलल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा मिळू शकतो. शिक्षण क्षेत्रातही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
