Horoscope Today 3 September: धर्म-ज्योतिषात गुरु ग्रहाला ज्ञान, समृद्धी आणि भाग्याचा कारक मानले जाते. ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून २ मिनिटांनी गुरु ग्रह आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. या गोचराचा प्रभाव ४ खास राशींवर दिसून येणार असून, त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि मान-सन्मानात वाढ होईल. तसेच या राशींची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. चला जाणून घेऊया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
या ४ राशींवर होणार गुरुची विशेष कृपा
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुचे नक्षत्र गोचर शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या धाडसात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. तसेच पदोन्नतीचेही योग आहेत. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगला फायदा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसेच नवीन जबाबदारी किंवा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जुना वाद मिटू शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुचे नक्षत्र गोचर खूप लाभदायक ठरणार आहे. मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ मिळेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे भरभरून कौतुक होईल. मालमत्ता किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आई-वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
