Today Horoscope 30 April: ३० एप्रिल २०२६ रोजी चंद्र कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हे गोचर दुपारी १ वाजून १४ मिनिटांनी होईल. म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला देखील चंद्र तूळ राशीतच असेल.

त्यामुळे राशीचक्रातील ३ राशींसाठी मे महिन्याची सुरुवात खूप चांगली ठरू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

मिथुन राशी (Gemini May Horoscope)

चंद्राचं गोचर तुमच्या राशीच्या पंचम भावात होईल. हा भाव भावना, शिक्षण आणि प्रेम यांच्याशी संबंधित मानला जातो. चंद्राची ही स्थिती मे महिन्याच्या सुरुवातीला प्रेम जीवनात चांगले परिणाम देईल.

सर्जनशील क्षेत्रात या राशीच्या लोकांना मनासारखे यश मिळू शकते. पैशाचेही योग बनतील. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

तूळ राशी (Libra May Horoscope)

चंद्र तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजेच पहिल्या भावात येईल. चंद्र हा शांत आणि सौम्य ग्रह असल्यामुळे तो पहिल्या भावात असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसेल.

अडकलेली कामे पूर्ण होतील, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे यश मिळू शकते. आरोग्यातही चांगले बदल दिसतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

धनु राशी (Sagittarius May Horoscope)

चंद्राचं गोचर तुमच्या लाभ भावात होईल. या गोचरामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते किंवा पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. केलेल्या गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. आयुष्यातील काही अडचणी दूर होऊ शकतात. करिअरमध्ये काही लोकांना मोठे यश मिळू शकते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)