Today Horoscope 6 August: आज ६ ऑगस्टच्या ज्योतिषीय गणनेनुसार ग्रहांची स्थिती अनेक राशींसाठी अतिशय शुभ आहे. आज चंद्र भरणी नक्षत्रात मेष राशीत भ्रमण करत आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र असून तो अनेक राशींना सुख-सुविधा आणि लाभ देत आहे. तसेच आज कर्क राशीत सूर्य, बुध आणि गुरू यांची युती झाली असून त्यामुळे त्रिग्रह योगासोबत बुधादित्य योगही तयार झाला आहे.
त्यामुळे आजचा दिवस मेष, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
आज चंद्र तुमच्या स्वतःच्या राशीत भ्रमण करत असल्याने तुम्ही अधिक कल्पक आणि सर्जनशील राहाल. कला, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना आज विशेष फायदा होईल. राशीच्या चौथ्या भावात तयार झालेला बुधादित्य योग आणि त्रिग्रह योग व्यवसायात लाभ मिळवून देत आहे. सरकारी काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न करा, यश मिळण्याची शक्यता चांगली आहे. कुटुंबाची, विशेषतः आईची साथ मिळेल. कामकाजही सुरळीत पार पडेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
आज चंद्र तुमच्या राशीच्या कर्मभावात भ्रमण करत आहे. तसेच तुमच्या राशीत तीन ग्रहांची युती झाल्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची चांगली संधी मिळू शकते. करिअरशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश राहतील आणि त्यांचे मार्गदर्शन मिळेल. एखाद्या महिला सहकारी किंवा मैत्रिणीकडूनही मदत मिळू शकते. पाणी, पेयपदार्थ आणि औषधांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. राशीच्या अकराव्या भावात तयार झालेल्या बुधादित्य योगामुळे मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. वडील किंवा पिढीजात व्यवसायातून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस आनंदाचा आणि रोमँटिक राहील. अष्टमस्थ चंद्रामुळे अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
आजचा दिवस करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येत आहे. राशीच्या भाग्यभावात तयार झालेला बुधादित्य योग तुम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा देईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाचा चांगला उपयोग होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मुलांकडूनही आनंदाची बातमी मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
आजचा दिवस यश आणि लाभ देणारा आहे. मुख्य उत्पन्नाव्यतिरिक्त दुसऱ्या मार्गानेही पैसे मिळण्याची संधी मिळू शकते. नोकरीत दिवस अनुकूल राहील आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास यशस्वी ठरेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. तुमच्या गोड बोलण्यामुळेही फायदा होईल. संशोधनाशी संबंधित कामात यश मिळेल. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत छान आणि रोमँटिक वेळ घालवण्याची संधी मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
