Rashi Bhavishya 6 July 2026 In Marathi : आज ६ जुलै २०२६ रोजी निज जेष्ठ महिन्यातील सप्तमी तिथी असणार आहे. आज पूर्वाभाद्रपद नक्षत्र जुळून येईल, त्याचबरोबर सौभाग्य योग एकाच दिवशी जुळून येत आहेत. राहू काळ ७ वाजून १४ मिनिटांनी सुरु होईल ते ८ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त १२ वाजून १ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आठवड्याची सुरुवात तुमच्या राशीसाठी कशी असणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ जुलै २०२६ ( Dainik Rashi Bhavishya 5 July 2026 In Marathi)
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. परक्या व्यक्तींपासून दूर राहावे. या आधीचा कामातील अनुभव उपयोगी पडेल. सरकारी कर्मचार्यानी दुविधा टाळावी. जवळचे मित्र भेटतील.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
आवश्यकता असेल तरच बोलावे. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. स्वत:च्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. दिवस मजेत जाईल. गोडीगुलाबीने कार्य साधाल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
कामाच्या स्वरुपाचे नवीन मार्ग शोधावेत. क्षणिक मोहात पडाल. स्वत:वर खर्च कराल. आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारे होईल. मनात नसती शंका आणू नका.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
आपल्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. चैन करण्याकडे अधिक कल राहील. व्यवसायातून चांगली कमाई होईल. पुढील गरजांसाठी आत्ताच खर्च कराल.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
व्यावसायिक कामातून चांगला लाभ मिळवाल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. दिवस आनंदात जाईल. नवीन विचार जोपासले जातील.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
धार्मिक गोष्टींची आवड पूर्ण कराल. ग्रह बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या समोरील व्यावसायिक संधी ओळखा. त्यातून तुमची सकारात्मकता वाढेल. पत्नीशी वाद वाढवू नका.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अचानक धनलाभाची शक्यता. कमी श्रमातून कामे साध्य करता येतील. जुनी देणी भागवता येतील. योग्य गुंतवणूक करू शकाल.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
व्यावसायिक अनुकूलता लाभेल. मित्रांच्या ओळखीतून लाभ होईल. प्रेमाचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांशी परिचय वाढवता येईल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
मानसिक शांतता लाभेल. त्यातून नवीन विचारांना चालना देता येईल. तुमच्यातील कल्पकतेला वाव देण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोकांकडून कामे सुरळीत पार पडतील. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
अधिक चपळाईने कामे करता येतील. कलेचा मनमुराद आस्वाद घ्याल. उगाचच येणारा आळस टाळावा लागेल. ऐनवेळी होणारी गडबड टाळावी. कामाचा योग्य आराखडा तयार ठेवावा.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
घरात टापटीप ठेवाल. घरातील काही कामे स्वत:हून अंगावर घ्याल. दिवस आपल्या स्वत:च्या इच्छेनुसार घालवाल. नवीन ओळखी करून घ्याव्यात. भडक शब्द वापरणे टाळा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
केलेल्या निश्चयानुसार वागावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. जुने मित्र गोळा कराल. कामासाठी काही वेगळे पर्याय
शोधावेत. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका.
