Today Horoscope: ६ जुलै २०२६ रोजी मीन राशीत विष योग तयार झाला आहे. ६ जुलैच्या सकाळी चंद्राचे मीन राशीत गोचर होताच हा योग तयार झाला. शनी आणि चंद्र यांच्या युतीमुळे विष योग तयार होतो.
शनी ग्रह आधीपासूनच मीन राशीत विराजमान असल्याने, चंद्राच्या मीन राशीत प्रवेशाबरोबरच ६ जुलै रोजी विष योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रात विष योग शुभ मानला जात नाही. या योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, ते जाणून घेऊया.
मेष रास
विष योग तुमच्या राशीच्या बाराव्या भावात तयार झाला आहे. हा भाव खर्च, नुकसान आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, चोरी होण्याची शक्यता आहे. विवाहितांनीही सावध राहावे. जोडीदारासोबत किरकोळ कारणांवरून वाद घालणे टाळा. पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्या. उपाय म्हणून शिव चालीसाचे पठण करा.
सिंह रास
तुमच्या राशीच्या आठव्या भावात शनी आणि चंद्र यांच्या युतीमुळे विष योग तयार झाला आहे. या योगामुळे आयुष्यात अचानक काही नकारात्मक बदल घडू शकतात. कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या विरोधात जाऊ शकते, त्यामुळे अधिक सावध राहण्याची गरज आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा. कामाचा ताण वाढल्यामुळे काहींना मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. उपाय म्हणून चंद्र ग्रहाच्या मंत्रांचा जप करावा.
तूळ रास
तुमच्या राशीच्या सहाव्या भावात विष योग तयार झाला आहे. त्यामुळे आरोग्याबाबत विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे. बाहेरचे तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. शत्रू पक्ष सक्रिय राहू शकतो, त्यामुळे कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. ज्या कामांबाबत तुमचा आत्मविश्वास कमी वाटतो, ती कामे सध्या टाळलेलीच बरी. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष विचलित होऊ शकते, त्यामुळे शिक्षणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. उपाय म्हणून शिवलिंगावर जल अर्पण करावे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
