Today Horoscope 7 July: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार आणि शिक्षणाचा कारक मानला जातो. ७ जुलै म्हणजे आज बुध ग्रह स्वतःच्या मिथुन राशीत वक्री होऊन प्रवेश करत आहे. याचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, हा बदल काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो.
निर्णय घेताना गोंधळ होणे, कामांमध्ये अडथळे येणे, व्यवसायात नुकसान होणे, आर्थिक ताण वाढणे, कौटुंबिक वाद निर्माण होणे आणि बोलण्यामुळे मतभेद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः चार राशींच्या लोकांनी अधिक सावध राहावे, संयम ठेवावा आणि बुध ग्रहाशी संबंधित उपाय करावेत, असा सल्ला दिला जात आहे.
मेष राशी (Today Aries Horoscope)
बुध ग्रह वक्री झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटू शकते. कामाच्या ठिकाणी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्यास उशीर होऊ शकतो. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा महागात पडू शकतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा खर्च करण्यापूर्वी काळजी घ्या.
कर्क राशी (Today Cancer Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी पुढील काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आणखी लांबू शकतात. विरोधकांमुळे त्रास वाढू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये निराशा येऊ शकते. कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलांबाबत चिंता वाढू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो.
कन्या राशी (Today Virgo Horoscope)
बुधाची वक्री चाल कन्या राशीच्या लोकांसाठी काही अडचणी निर्माण करू शकते. करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास उशीर लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. परदेश प्रवास, व्हिसा किंवा परदेशी कंपन्यांशी संबंधित कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागू शकते.
मीन राशी (Today Pisces Horoscope)
बुध ग्रहाच्या वक्री अवस्थेमुळे मीन राशीच्या लोकांसाठीही काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचे स्रोत प्रभावित होऊ शकतात. खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना निराशा येऊ शकते. वैवाहिक जीवनात मतभेद वाढण्याची शक्यता आहे. तसेच करिअर आणि व्यवसायातही अडथळे आणि विलंबाचा सामना करावा लागू शकतो.
या उपायांनी मिळू शकतो दिलासा
या चारही राशींच्या लोकांनी प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाची पूजा करून त्यांना दूर्वा अर्पण करावी. हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरवी मूग डाळ दान करणे शुभ मानले जाते. ‘ॐ बुं बुधाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. कोणतीही गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नये. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे आणि गरजू लोकांना मदत करावी. असे केल्याने बुधाच्या नकारात्मक प्रभावात काही प्रमाणात कमी होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
