Horoscope Today: ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राच्या राशीबदलाचा शुभ-अशुभ परिणाम सर्व १२ राशींवर होत असतो. ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:५९ वाजता चंद्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. १० जुलैच्या संध्याकाळपर्यंत चंद्र याच राशीत भ्रमण करेल. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि त्याचा आर्थिक स्थितीवरही विशेष प्रभाव असतो. चंद्राचा हा राशीबदल कोणत्या ४ राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे, ते जाणून घेऊया.
वृषभ राशी (Taurus Zodiac Sign)
वृषभ राशीच्या लोकांसाठी चंद्राचा हा राशीबदल शुभ ठरणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. मानसिक तणाव कमी होईल. व्यवसायात मोठी डील मिळू शकते. संयम ठेवून अडचणींवर उपाय शोधा. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
कर्क राशी (Cancer Zodiac Sign)
कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्राचा मेष राशीत प्रवेश करिअरसाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळण्याचे मार्ग खुलतील. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा योग्य काळ आहे. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.
कन्या राशी (Virgo Zodiac Sign)
कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्राचे हे गोचर शुभ फल देणारे ठरू शकते. काळ अनुकूल राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. शिक्षण आणि सर्जनशील क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल.
मीन राशी (Pisces Zodiac Sign)
मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राचा हा राशीबदल खूप शुभ ठरू शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल आणि कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते. अनेक मार्गांनी पैसे कमावण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
