Today Horoscope 8 June: सूर्य ग्रह ८ जून रोजी मंगळाच्या स्वामित्वाखालील मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकते. या राशींना करिअरमध्ये चांगले बदल दिसू शकतात तसेच आर्थिक लाभाचेही योग निर्माण होऊ शकतात. सूर्याचा मृगशिरा नक्षत्रातील प्रवेश ८ जून रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी होईल. चला तर मग, या राशींविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कर्क राशी (Cancer Horoscope)
तुमच्यासाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरू शकते. तुमच्या ऊर्जेत वाढ होईल आणि तुम्ही ती योग्य ठिकाणी वापरू शकाल. या राशीतील काही लोकांना वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होण्याची शक्यता आहे. केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला नफा मिळू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ होण्याचे संकेत आहेत. साठवलेल्या धनात वाढ होऊ शकते. तसेच मोठ्या भावंडांच्या मदतीमुळे करिअरमधील अडचणी दूर होऊ शकतात. राजकारण क्षेत्राशी संबंधित लोकांनाही सकारात्मक अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope)
तुमच्यासाठीही सूर्याचे नक्षत्र परिवर्तन आयुष्यात महत्त्वाचा बदल घडवून आणणारे ठरू शकते. तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. मित्र किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी राहील.
मकर राशी (Capricorn Horoscope)
या राशीतील काही लोकांना इच्छित ठिकाणी आणि अपेक्षित पगारावर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या काही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठे व्यावसायिक करार मिळण्याचे योग आहेत. तुम्ही जितके सक्रिय राहाल तितका अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या सूर्याचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल राहील. मात्र, प्रेमसंबंधांच्या बाबतीत या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
