आजचे राशीभविष्य 8 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य ८ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

17:43 (IST) 8 May 2025

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.

17:32 (IST) 8 May 2025

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

चटकन रागवू नका. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.

17:27 (IST) 8 May 2025

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

17:13 (IST) 8 May 2025

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

16:37 (IST) 8 May 2025

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.

15:56 (IST) 8 May 2025

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

15:40 (IST) 8 May 2025

कुंडलीमध्ये शनि कोणत्या घरात यावरून ठरते तुम्ही श्रीमंत होणार की गरीब; जाणून घ्या, कधी मिळते अपार धनसंपत्ती अन् पैसा?

Position of Shani in Your Kundli : आज आपण जाणून घेणार आहोत की कुंडलीच्या कोणत्या घरात शनिचे विराजमान राहणे आपल्या जीवनाला राजयोगाकडे घेऊन जाणारे ठरू शकते. ...अधिक वाचा
14:18 (IST) 8 May 2025

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.

13:20 (IST) 8 May 2025

१६ दिवसांनी 'या' राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण? बुधदेवाचे महागोचर होताच आयुष्याचं होईल सोनं, कुणाला मिळणार पेढे वाटण्याची संधी

Budh Transit 2025: बुध ग्रह लवकरच राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. ...अधिक वाचा
13:17 (IST) 8 May 2025

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.

12:43 (IST) 8 May 2025

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

10:14 (IST) 8 May 2025

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

09:43 (IST) 8 May 2025

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.

09:28 (IST) 8 May 2025

येणारे २६ महिने शनी देवाच्या कृपेचे; मीन राशीतील वास्तव्य 'या' तीन राशींना देणार भरपूर पैसा अन् गडगंज श्रीमंतीचे सुख

Shani Meen Gochar 2025: शनीच्या मीन राशीतील प्रवेशाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. हे राशी परिवर्तन त्यांच्यासाठी खूप खास असेल. ...अधिक वाचा
09:25 (IST) 8 May 2025

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.

09:11 (IST) 8 May 2025

Best Lovers Zodiac Signs: ‘या’ राशीचे लोक आहेत सर्वोत्तम जोडीदार, एकमेंकावर करतात भरपूर प्रेम!

Best Lovers Zodiac Signs: वैदिक ज्योतिष्यशास्त्रात १२ राशी आणि २७ नक्षत्र होते आणि या राशींवर नवग्रहांचा अधिपत्य होता. ज्यामुळे या राशींचे स्वरूप आणि व्यक्तिमत्व एकमेकांपासून वेगळे आहे. येथे अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे लोक सर्वोत्तम जोडपे असल्याचे सिद्ध होतात. वाचा

08:15 (IST) 8 May 2025

Rajyog 2025: जूनपासून चमकणार ३ राशींचे नशीब! शक्तिशाली राजयोग करणार मालामाल, वाढेल पदप्रतिष्ठा

Venus Transit 2025: जूनमध्ये, राक्षसांचा गुरु, म्हणजेच शुक्र, केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहे, जो ३ राशींसाठी खूप शुभ ठरू शकतो. या राजयोगामुळे, रहिवाशांचे जीवन धन आणि समृद्धीने भरलेले असेल. त्याचप्रमाणे, राक्षसांचा गुरु शुक्र ग्रहात एक शक्तिशाली राजयोग तयार होत आहे. शुक्र हा धन, समृद्धी आणि प्रेमाचा कारक आहे. २९ जून २०२५ रोजी शुक्र वृषभ राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे केंद्र त्रिकोण राज योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग खूप शुभ आणि प्रभावी मानला जातो.

08:14 (IST) 8 May 2025

२१ मे पासून ‘या’ राशींच्या हातात येईल बक्कळ पैसा? बुधदेवाचे नक्षत्र बदल आर्थिक स्थिती उंचावणार, करिअरला मिळणार नवी दिशा!

Budh Nakshatra Parivartan: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राजकुमाराचे स्थान बुध ग्रहाला आहे, नऊ ग्रहांपैकी एक असलेला बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशास्त्र, गणित, संवाद, हुशारी, भाषण, संवाद आणि मैत्री इत्यादींसाठी जबाबदार आहे. बुध ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. त्यानंतर नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा सर्व बारा राशींवर परिणाम होतो. व्यवसायाचा दाता बुध ग्रह २१ मे, बुधवारी रात्री १०:२३ वाजता कृतिका नक्षत्रात भ्रमण करणार आहे. कृतिका नक्षत्रावर सूर्य देवाचे अधिराज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींना चांगले दिवस येऊ शकतात. यामुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात… 

07:44 (IST) 8 May 2025

Today’s Horoscope: मोहिनी एकादशीला ‘या’ ३ राशींवर बरसणार लक्ष्मी-नारायणाची कृपा; इच्छापूर्ती ते बक्कळ धनलाभाची लाभेल संधी

Rashi Bhavishya In Marathi, 8 May 2025: ८ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. एकादशी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर एकादशी सुरु होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र रात्री ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तसेच आज हर्षण योग जुळून येईल. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ पर्यंत असणार आहे. तसेच आज मोहिनी एकादशी असणार आहे. मोहिनी एकादशीला तुम्हाला लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद लाभण्याची चिन्हे दिसतायत का जाणून घेऊया…

astrology live blog