Daily Horoscope 9 June 2026 In Marathi : उद्या ९ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील नवमी तिथी असणार आहे. आज पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि प्रिती योग जुळून येणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५६ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ३ वाजून ४८ मिनिटांनी सुरु होईल ते ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असणार आहे. मंगळवारी तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ९ जून २०२६ ( Horoscope Today 9 June 2026 In Marathi)
आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.
आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
आर्थिक मानात सुधारणा होईल. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो.
आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
कामात फार कोणावरही विसंबून राहू नका. कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.
आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
आंतरिक इच्छा पूर्ण होतील. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी.
आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केन्द्रित करावे. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.
आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. कमिशन मधून चांगला मोबदला मिळेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्यांशी सुसंवाद साधावा.
आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.
आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा.
आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.
आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत.
आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता.
आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
रागाला आवर घालावा लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका.
