Today Horoscope: ग्रहांचा राजकुमार बुध ५ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ७:५८ वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत कर्क राशीत राहील. या काळात सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे हे राशीपरिवर्तन ४ राशींसाठी खूप शुभ मानले जात आहे. या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि करिअरमध्येही मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.
मेष रास: करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे राशीपरिवर्तन खूप शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. व्यवसायातही भरभराट होईल. ज्या कामाला हात घालाल त्यात यश मिळेल. नवीन कामाची सुरुवातही करू शकता. मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो.
मिथुन रास: नवीन नोकरी मिळण्याची शक्यता
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे राशीपरिवर्तन खूप सकारात्मक ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगली प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळू शकतो. या काळात तुमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढेल.
कन्या रास: नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे राशीपरिवर्तन शुभ राहील. करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध अधिक चांगले राहतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकते. एखाद्या मोठ्या प्रकल्पात यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
मकर रास: करिअरमध्ये भरघोस प्रगती होईल
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे कर्क राशीतील राशीपरिवर्तन खूप शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये भरघोस प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. नवीन कामाची सुरुवात करू शकता. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
