Budh Gochar: बुध ग्रहाचे कन्या राशीत होणारे गोचर खूप शुभ ठरणार आहे. बुध ग्रह कन्या राशीत उच्च स्थानावर असतात. तसेच कन्या राशीचे स्वामीही बुध ग्रह आहेत. बुध ग्रह २६ सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत राहतील. या काळात काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो.
बुध गोचर राशीभविष्य
बुध ग्रहाच्या कन्या राशीतील गोचरामुळे मिथुन, सिंह, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होईल. या लोकांना करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील. आर्थिकदृष्ट्याही हा काळ तुमच्यासाठी चांगला राहणार आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे कन्या राशीत प्रवेश करणे चांगले ठरेल. घरात आणि कुटुंबात सुख-समृद्धी राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखाद्या जुन्या कामात यश मिळू शकते. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवा.
सिंह राशी
बुध ग्रहाचे कन्या राशीतील गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. तुमची अनेक कामे पूर्ण होतील. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक फायदा होईल आणि कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल.
कन्या राशी
बुध ग्रहाचे गोचर त्यांच्याच राशीत म्हणजेच कन्या राशीत होत असल्याने या राशीच्या लोकांना फायदा होईल. कन्या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आत्मविश्वास वाढेल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे गोचर शुभ परिणाम देईल. तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळेल. नवीन कामात यश मिळू शकते. कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. तसेच प्रवास करण्याची शक्यता आहे.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर त्यात यश मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
