Budh Gochar: बुध ग्रह आज १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी स्वाती नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. ३ नोव्हेंबरपर्यंत बुध ग्रह विशाखा नक्षत्रात राहतील. या काळात काही राशींना लाभ मिळू शकतो.

बुध गोचर राशीभविष्य

बुध ग्रहाला बुद्धी, व्यापार आणि वाणीचा कारक मानले जाते. विशाखा नक्षत्राचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे. गुरूच्या नक्षत्रात बुध ग्रहाचा प्रवेश वृषभ, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळू शकते.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले ठरणार आहे. या गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. कामात यश मिळेल. व्यावसायिकांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा फायदा होईल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कमाईचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगती करता येईल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तुमच्या नवीन ओळखी होतील. या ओळखींचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

तूळ राशी (Libra Horoscope)

बुध ग्रहाचा विशाखा नक्षत्रातील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामात यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

बुध ग्रहाचा विशाखा नक्षत्रातील प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. व्यावसायिकांना प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)