Today Horoscope 15 May: आज म्हणजेच १५ मे रोजी सूर्य ग्रह आपल्या उच्च राशी मेषमधून बाहेर पडून वृषभ राशीत गोचर करणार आहेत. सूर्याचे हे गोचर सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी होईल. सूर्य वृषभ राशीत प्रवेश करताच मिथुन राशीत असलेल्या गुरु ग्रहासोबत द्विद्वादश योग तयार होणार आहे. कारण सूर्य गुरु ग्रहापासून द्वादश भावात असतील, तर गुरु सूर्यापासून दुसऱ्या भावात असतील.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि गुरु हे मित्र ग्रह मानले जातात, त्यामुळे काही राशींसाठी सूर्य-गुरुचा हा द्विद्वादश योग भाग्य उजळवणारा ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.
मेष राशी (Today Horoscope Aries)
द्विद्वादश योगाच्या काळात सूर्य तुमच्या दुसऱ्या भावात आणि गुरु तिसऱ्या भावात असतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही लोकांना पदोन्नती मिळू शकते. गुरुच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास आणि धाडस वाढेल, त्यामुळे काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात.
मिथुन राशी (Today Horoscope Gemini)
मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या योगामुळे सुधारू शकते. गुंतवलेले पैसे चांगला फायदा देऊ शकतात. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणारे किंवा विदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. कामासाठी केलेले प्रवासही आनंददायी आणि फायदेशीर ठरतील.
सिंह राशी (Today Horoscope Leo)
सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि द्विद्वादश योगाच्या काळात तो तुमच्या कर्म भावात असेल. त्यामुळे हा योग तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. गुरु आणि सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकते.
तूळ राशी (Today Horoscope Libra)
तुला राशीच्या लोकांसाठीही हा द्विद्वादश योग चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील, त्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर चांगली नोकरी आणि चांगला पगारवाढीचा योग आहे.
धनु राशी (Today Horoscope Sagittarius)
गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे द्विद्वादश योगाचे शुभ परिणाम तुम्हालाही मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, फक्त योग्य संधी ओळखण्याची गरज आहे. काही लोकांना पितृ संपत्तीचा लाभ मिळू शकतो. सूर्याच्या प्रभावामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. सरकारी क्षेत्रातूनही फायदा होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
