scorecardresearch

Horoscope : आज ‘या’ राशींना करावा लागू शकतो अडचणींचा सामना; पैसेही चोरीला जाऊ शकतात

जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ ठरेल आणि कोणत्या राशींना आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

काही राशींना आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आज शुक्रवार म्हणजेच २२ एप्रिल हा दिवस काही राशींसाठी अडचणींनी भरलेला ठरू शकतो. काही राशींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तर काही राशींसाठी शुक्रवारचा दिवस शुभ ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ ठरेल आणि कोणत्या राशींना आज अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मेष :

या दिवशी रोजपेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्च करताना आधीच विचार करणे योग्य ठरेल. ऑफिसमध्ये लक्ष देऊन काम करावे. एखाद्या मीटिंगचे नेतृत्व तुम्हाला करावे लागू शकते, त्यामुळे याची तयारी ठेवावी. खाण्यापिण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू शकते. अनावश्यक काळजी तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. योजना बनवा आणि आपले काम करा. आज तुम्ही स्वयंपाकघरात हात आजमावून पहा. तुमचे आवडते पदार्थ बनवा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या.

वृषभ :

आज तुमचे मन कोणत्यातरी अज्ञात भीतीने व्यथित होईल. मनाला तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. स्पर्धेला सामोरे जाण्याची आणि जिंकण्याची तयारी करा पण सहकर्मचाऱ्यांचा मत्सर करू नका, हे ठीक नाही. तुम्ही करत असलेल्या व्यवसायाबद्दल अधिक ज्ञान मिळवा आणि व्यवसायातील बारकावे समजून घ्या. तुम्हाला कोणताही कोर्स करायचा असेल तर नक्की करा. महिलांशी वाद होण्याची शक्यता असल्यास टाळा. वाद घालण्याची गरज नाही.

१५ दिवसांच्या अंतराने लागणार वर्षातील दोन मोठी ग्रहणे; ‘या’ राशींच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याचे संकेत

मिथुन :

आज तुम्ही घरातील लोकांशी सौम्यपणे वागा. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बॉसला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत काही कामे थांबतील पण संयम ठेवा. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो, मात्र प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. औषधे नियमित घ्या. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. अगोदरच खबरदारी घेतली तर बरे होईल.

कर्क :

आज तुम्ही आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावा. तरुणांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा पण त्याचा गैरवापर करू नये. तुम्ही कुठेही काम कराल, त्या कर्मक्षेत्रात तुमचे ज्ञान वाढवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित सरकारी कागदपत्रे मजबूत करावीत. तुम्हाला कोणतेही शुल्क जमा करायचे असल्यास ते करा. युरिन इन्फेक्शनच्या बाबतीत सतर्क राहा. ज्यांना या आजाराने आधीच ग्रासले आहे, त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घरामध्ये आग लागण्याची शक्यता आहे, सावधगिरी बाळगा. काम केल्यानंतर गॅस स्टोव्ह बंद करा. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्या आणि लोकांशी संवाद साधा.

सिंह

शुक्रवार हा मानसिक अस्वस्थतेचा दिवस आहे. पण तुम्ही या गोंधळून जाऊ नये. शांतपणे विचार करा. शिक्षक वर्गासाठी दिवस शुभ परिणाम देणारा आहे. चांगल्या परिणामांची अपेक्षा ठेवून काम करा. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे, मग ते कोणतेही काम करत असले तरी. तुम्हाला स्टोनचा त्रास असेल तर सावधान. तुम्हाला वेदना होऊ शकतात. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. अनुकूल परिस्थिती नसली तरी वैवाहिक जीवनात शांतता राखा. तरुणांनी अवाजवी काळजी टाळावी. तुम्ही कृती आराखडा बनवून काम करा.

Akshaya Tritiya 2022 : जाणून घ्या या वर्षी कोणत्या दिवशी आहे अक्षय तृतीया; लग्न कार्यासाठी आहे शुभ मुहूर्त

कन्या :

आज या राशीच्या लोकांचे मन खूप वेगाने काम करेल, त्याला सर्जनशील दिशा द्या. बॉसशी वाद घालण्याची गरज नाही, तुमचा मुद्दा नम्रपणे सांगा. जे व्यापारी घाऊक विक्रीचे व्यवहार करतात त्यांना चांगला नफा मिळू शकेल. तुमच्या कानात वेदना होण्याची शक्यता आहे. समस्या जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. घराशी संबंधित कोणतीही उपयुक्त वस्तू खरेदी करण्याची परिस्थिती आहे. सोशल मीडियावर सक्रिय होण्याची वेळ आली आहे, तुम्ही तुमचे नेटवर्क वाढवायला हवे.

तूळ :

तुमचे बोलणे इतके चांगले असेल की त्याचा प्रभाव इतरांवर पडेल. सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापारी दृष्टिकोनातून धान्य व्यापाऱ्यांना लाभाचे योग येत आहेत. आज तुम्हाला निरोगी स्वास्थ्याचा अनुभव मिळेल. जुन्या आजारांमध्येही सुधारणा दिसून येईल. वडिलांना नाराज करणे योग्य नाही. त्यांची नाराजी दूर करा. आज तुमचे मन भक्तीमध्ये रमेल. भक्तीशी संबंधित पुस्तके वाचावीत.

वृश्चिक :

आज तुम्ही तुमची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे. मोठा नफा दाखवून कोणी तुमची फसवणूक करू शकते. तुम्ही नवीन काम हाती घेतले असेल तर ते आनंदाने करा, काम सोपे होईल. जर तुम्ही टेलिकम्युनिकेशनमध्ये काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. आजारांपासून दूर राहायचे असेल तर स्वत:ला थोडा वेळ द्या. सकाळी उठून योगा करा. आईची सेवा करण्याचे पुण्य क्वचित मिळते, जर तुम्हाला ही संधी मिळाली असेल तर ती सोडू नका आणि आईची नक्कीच सेवा करा. सामाजिक शिस्त पाळली पाहिजे, असे केल्याने सर्वांकडून आनंद मिळेल.

धनु :

तुमची मेहनत हीच तुमची ओळख आहे. हेच तुमचे वैशिष्ट्य आहे, हे विसरू नये. एखादे काम करताना तणाव जाणवत असेल तर धीर धरावा. तुमची परिस्थिती सुधारेल. मोठ्या उद्योगपतींनी गुंतवणूक टाळावी, नुकसानही होऊ शकते. जास्त पाणी पिण्यासोबतच हलका आहार घ्या, तुम्ही निरोगी राहाल. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवाल, सर्वजण आनंदी राहतील. तरुणांना नोकरीशी संबंधित काही चांगली माहिती मिळेल आणि त्यांचे मन प्रसन्न राहील.

संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास का केली जाते मनाई? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण

मकर :

या राशीच्या लोकांनी काही काळ घाईघाईत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. विचारपूर्वक काम करा. परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. इच्छा असेल तर प्रयत्न करा. कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन स्टॉकची मागणी करत रहावे. पोटात दुखण्याची शक्यता आहे, फक्त पचण्याजोगे आणि पौष्टिक आहार घ्या. तुमच्या गोष्टी कुटुंबासोबत शेअर केल्या तर तुम्हाला आधार मिळेल. गुरुसारख्या व्यक्तीचा सहवास मिळेल. त्यांच्या पात्रता आणि अनुभवाचा फायदा घ्या.

कुंभ :

या राशीच्या लोकांच्या त्रासाचे कारण म्हणजे विनाकारण चिंता करणे. काळजी करा पण अनावश्यक नाही. सॉफ्टवेअरशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे. व्यावसायिकांना सामान्य दिवसांपेक्षा आज जास्त मेहनत करावी लागेल. जर तुम्हाला चांगले आरोग्य राखायचे असेल तर तुमचा आहार चांगला ठेवा आणि चुकूनही जंक फूड खाऊ नका. भावाला आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला. त्याची प्रकृती बिघडू शकते. सामाजिक क्षेत्रात इतरांना मदत करण्याची संधी मिळाल्यास आपल्या क्षमतेनुसार नक्कीच मदत करा.

मीन :

आज आळस चांगला नाही. सक्रिय व्हा आणि पूर्ण उर्जेने काम करा. सहकाऱ्यांसोबत सामंजस्याने काम करा, हे तुमच्यासाठीही महत्त्वाचे आहे. किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. पायाला सूज येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त सूज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्याकडे पाहुणे येऊ शकतात, त्यांच्या स्वागतासाठी तयार रहा. स्पर्धेची तयारी करणार्‍यांसाठी, अधिक मेहनत करण्याची ही वेळ आहे, यामुळे तुम्हाला यश मिळेल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Today these zodiac signs may have to face difficulties money can also be stolen pvp

ताज्या बातम्या