मार्च महिन्याचा शेवटचा दिवस ६ राशींसाठी धनलाभ आणि कुटुंबासाठी मोठा आनंद घेऊन येऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार ३१ मार्च २०२६ ला मंगळवारी चंद्र कन्या राशीत गोचर करणार आहे. सूर्य आणि चंद्राचा व्यतिपात योग निर्माण होत आहे. तसेच सूर्य आज रेवती नश्रत्रामध्ये गोचर करत आहे. या शिवाय वृद्धी योगाचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. तसेच मंगळवारी हनुमान जयंतीमुळे बंजरगबलीची कृपा होईल. आजचा दिवस मेष, मकर, तूळसह ६ राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.

आजच्या ६ भाग्यशाली राशी

मेष राशी (Arise)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ ठरणार आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना या काळात यश मिळेल. तर नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचा ताण कमी असेल तरी आज जितके काम पूर्ण होईल तितके चांगले आहे. कारण आज केलेले काम भविष्यात फायदेशीर ठरेल. प्रेम आणि कौंटुबिक जीवनात आनंदी आनंद होईल.

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीची धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढेल. कामाकाज देखील चांगले होईल. आज ठरवलेले ध्येय काही काळांनंतर पूर्ण होईल. कुटुंबाची साथ मिळेल. पैसा मिळू शकतो. मित्र आणि सहकार्यांची चांगली साथ लाभेल. वाणीच्या जोरावर काम पूर्ण होईल.

तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या लोकांना आज संपर्कांतून लाभ होईल. टीमवर्कचा फायदा होईल. अचानक धनलाभ अपेक्षित आहे. कुटुंबाची जीवन चांगले असेल. एखादा आनंदाची बातमी मिळू शकते. जोडीदाराबरोबर रोमँटीक वेळ घालवण्याची संधी मिळेल. गोड बोलून अवघड कामही सहज पूर्ण होईल.

मकर राशी (Capricorn)

मकर राशी्च्या लोकांचा उत्साह आज चांगला असेल आणि लवकर काम पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढेल. संपत्ती संबधीत काम पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासह जाण्याची योजन निर्माण होऊ शकते. धन संपत्ती वाढेल. नोकरी करणाऱ्यांना फ्रिलान्सिंग काम मिळू शकते.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना आजच्या दिवशी आर्थिक प्रकरणांमध्ये चांगले काम मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. तसेच व्यापारी वर्गाबरोबर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सन्मान मिळू शकतो. बॉस तुमच्या कामाचे कौतुक करतील. वडिलांच्या संपत्ती किंवा कुटुंबातून लाभ होऊ शकतो. धार्मिक कामाचा हिस्सा मिळू शकतो.

कुंभ राशी (Aquarius )

कुंभ राशीच्या लोकांना व्यापारासाठी आज चांगला दिवस आहे. नोकरी करणारे वेळेत काम संपवतील ज्यामुळे कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. सामाजिक संपर्क वाढेल. एखाद्या मित्राशी किवा जवळच्या नातेवाईकाला भेटण्याची योजना आखू शकता.