Ajache Rashi Bhavishya 22 May 2026 In Marathi : उद्या २२ मे २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी रात्री ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज वृद्धी योग जुळून येईल आणि आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ४७ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ २ वाजता सुरु होईल ते ३ वाजून ४३ पर्यंत असणार आहे. तसेच आज चंद्राचे मकर राशीत गोचर होणार आहे. तर या गोचराचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा असणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २२ मे २०२६ (Daily Horoscope 22 May 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
उगाचच चिडचिड कराल. कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन लोकांशी संपर्क होईल. नोकरीच्या ठिकाणी कामे सुरळीत पार पडतील.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. अति श्रमाचा ताण जाणवेल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. कामात चलबिचलता येईल. गप्पांच्या ओघात शब्द देताना काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामात एकसूत्रता ठेवावी.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
जवळचा प्रवास चांगला होईल. भावंडांचा सहवास लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवीन विषय आवडीने जाणून घ्याल. आवडता छंद जोपासाल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक सौख्यात वेळ घालवाल. तरुण वर्गाशी जवळीक वाढेल. नवीन मित्र जोडाल. काही बाबीत तडजोड करावी लागेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. कमिशन मधून मिळणार्या फायद्याचा लाभ उठवा. धार्मिक कामातून मान वाढेल. वरिष्ठांना नाराज करू नका. पोटाची काळजी घ्यावी.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. मुलांवर बारीक लक्ष ठेवावे. राग अनावर होऊ देऊ नका. पत्नीचे मत मान्य करावे लागेल. अचानक धनलाभ संभवतो..
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
कौटुंबिक शांतता जपावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. तडजोडीतून काही प्रश्न मार्गी लावावेत. जुनी कामे पूर्ण करता येतील. फार विचार करत बसू नका.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
कामातील उत्साह वाढवावा लागेल. मनातील शंका बाजूला साराव्यात. कौटुंबिक प्रश्न संयमाने हाताळा. प्रवासात सावधानता बाळगा. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
भक्तीमय वातावरणाचा अनुभव घ्याल. बोलताना सारासार विचार करावा. जुन्या गोष्टीत फार अडकून राहू नका. अकारण होणार्या खर्चाकडे लक्ष ठेवा. कामात सहकार्यांची साथ मिळेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
उगाच त्रागा करू नका. मनाची चंचलता कमी करण्याचा प्रयत्न करावा. कचेरीची कामे अडकून राहतील. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. घरात अधिकार वाणीने वागाल.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
खर्चाचे प्रमाण वाढेल. बाहेरील गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. सामाजिक जाणीव जागृत ठेवावी. जवळचे नातेवाईक भेटतील. अधिकाराचा स्वबळावर वापर करावा.
