Rashi Bhavishya 6 June 2026 In Marathi : उद्या ६ जून २०२६ रोजी अधिक मासातील जेष्ठ महिन्यातील षष्टी तिथी असणार आहे. आज श्रवण नक्षत्र आणि इंद्र योग जुळून येणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ८ वाजून ५१ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे. शनिवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, ६ जून २०२६ ( Aajche Rashi Bhavishya 6 June 2026 In Marathi)
आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)
कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. मित्रांच्या गराड्यात राहण्याची इच्छा होईल. वरिष्ठांकडून सहकार्याची फार अपेक्षा ठेऊ नये. आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल.
आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)
व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. मानसिक चांचल्य जाणवेल. व्यवसायातून चांगली कमाई होईल. वसुलीत आनिश्चितता जाणवेल.
आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)
बौद्धिक कामात सावध राहावे. मोहाला बळी पडू नका. निर्णयात इतरांवर विसंबून राहू नका. व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.
आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)
कार्यकालीन स्थितीवर लक्ष द्यावे. भावनाविवश होऊन विचार करू नका. मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.
आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)
घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्यांना नाराज करू नका. जोडीदाराचा राग समजून घ्यावा लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता. कामाशिवाय इतर गोष्टी टाळाव्यात.
आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)
दृष्टीकोन बदलून पहावा लागेल. हातातील संधी जाऊ देऊ नका. अपचनाचा त्रास जाणवेल. माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.
आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा. आपल्यातील स्वाभाविक दोष टाळता आले तर पहावे. वरिष्ठांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे. अचानक धनलाभाची शक्यता.
आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)
व्यावसायिक कामातून मानसिक शांतता लाभेल. व्यक्तिगत छंद जोपासावेत. क्रोधाची भावना उचंबळू देऊ नका. क्षुल्लक चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. अतिरिक्त खर्च टाळावा.
आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)
आवक मर्यादित राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. अधिकाराचा योग्य ठिकाणी वापर करावा.
आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)
कामाचा जोम अधिक वाढेल. कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल. सढळ हस्ते खर्च केला जाईल. परिस्थितीचा योग्य अंदाज बांधावा.
आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)
भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल. व्यवसायात नवीन योजना आखाव्यात. कुटुंबियांशी वाद घालू नका. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)
अचानक नवीन खर्च समोर येऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. कौटुंबिक कामासाठी अधिक वेळ द्याल. सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
