गुरूने नक्षत्र परिवर्तन केले आहे. गुरूने शनीच्या मालकीच्या पुष्य नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश केला असून, त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी गुरू आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्राला ‘नक्षत्रांचा राजा’ मानले जाते. या गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला, तरी पुष्य नक्षत्राच्या अंतिम टप्प्यात गुरूचा प्रवेश चार राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्या राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया:
मेष: (Aeris)
गुरूचे हे नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील, तसेच प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत असून कमाईचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गुंतवणुकीचा विचार करत असल्यास चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
मिथुन: (Gemini)
या गोचरचा मोठा फायदा मिथुन राशीच्या लोकांना होईल. अडचणी हळूहळू कमी होऊन कौटुंबिक समस्या सुटतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील, आरोग्यात सुधारणा होईल आणि अचानक आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होईल.
तूळ: (Libra)
या काळात तूळ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, जो फायदेशीर ठरेल. धार्मिक कार्य व पूजेमध्ये रुची वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि मन प्रसन्न राहील.
कुंभ: (Aquarius)
हा बदल कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल मानला जातो. सुख-सोयींमध्ये वाढ होईल आणि नोकरीत प्रगती किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नवीन घर किंवा वाहन खरेदीवर खर्च होण्याची शक्यता आहे, तर पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील.
