Trigrahi Yog 2026 ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे भ्रमण आणि त्यांची स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जेव्हा एकाच राशीत तीन ग्रह एकत्र येतात, तेव्हा ‘त्रिग्रही योग’ निर्माण होतो. पंचांगानुसार, ३ नोव्हेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत आधीपासूनच गुरु आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे चंद्र, गुरु आणि केतु यांच्या युतीने सिंह राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे.

या शुभ योगाचा विशेष प्रभाव ४ राशींच्या जातकांवर दिसून येईल. या राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात प्रचंड यश आणि धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमच्या राशीचा यात समावेश आहे का:

मेष रास (Aries)

मेष राशीच्या जातकांसाठी हा त्रिग्रही योग अत्यंत भाग्यशाली ठरेल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.संततीकडून एखादी अत्यंत आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील.नोकरी आणि व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना यश लाभेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने मानसिक समाधान मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत आखू शकता.

सिंह रास (Leo)

सिंह राशीतच हा योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम सिद्ध होईल. तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. कामाचा वेग आणि कार्यक्षमता सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कार्यालयात वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. पवडिलोपार्जित मालमत्तेसंबंधित वादात दिलासा मिळेल.कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आधीपासून सुरू असलेल्या कामांमधून चांगला नफा मिळेल. व्यापाऱ्यांची एखादी मोठी व्यवसाय करार (डील) अंतिम होऊ शकते. भागीदारीत (Partnership) काम करणाऱ्यांना उत्तम लाभ मिळेल. कुटुंबातील जुने मतभेद आणि अडचणी दूर होऊन नातेसंबंध दृढ होतील.आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही आयुष्यात योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या जातकांसाठी त्रिग्रही योग अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. नशिबाच्या बळावर सर्व रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नोकरदारांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील.पैशांशी संबंधित समस्या कमी होतील. व्यवसायात आर्थिक नफा वाढेल. लांबच्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते आणि हा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी व लाभदायक ठरेल.