Trigrahi Yog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याची राशीबदल ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. पंचांगाच्या गणनेनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सूर्यदेव कन्या राशीतील आपला प्रवास संपवून तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे तो १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहील.शुभ ग्रह शुक्र आणि बुध आधीपासूनच तूळ राशीत आहेत, ज्यांच्या युतीने ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ निर्माण झाला आहे. १७ ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करेल तेव्हा, सूर्य आणि बुध यांच्या युतीने ‘बुधादित्य राजयोग’ आणि सूर्य व शुक्र यांच्या युतीने ‘शुक्रदित्य राजयोग’ ही दुर्मिळ त्रिग्रहीय महासंधी निर्माण होईल. हा अद्वितीय धनयोग या तीनही राशींसाठी प्रगती, पद, प्रतिष्ठा आणि प्रचंड आर्थिक लाभाचे दरवाजे उघडेल.

त्रिग्रही योग नशीब बदलणार ‘या’ राशींचे भाग्य

सिंह राशी

त्रिग्रही योग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरू शकतो. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी मिळण्याची शक्यता असून तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर व्यवहार मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीसाठी त्रिग्रही योग आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार करण्याचा विचार प्रत्यक्षात आणता येईल. गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य नियोजन केल्यास फायदा मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि एखादी चांगली बातमी मिळू शकते.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योगामुळे मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभू शकते. रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. आर्थिक बाबतीत स्थैर्य वाढू शकते. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा करार किंवा महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)