Trigrahi Yog: वैदिक ज्योतिषानुसार १३ फेब्रुवारीला त्रिग्रही योग तयार होणार आहे. ६ फेब्रुवारीला धनाचा कारक ग्रह शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्यदेवही कुंभ राशीत येईल. कुंभ राशीत राहू ग्रह आधीपासूनच आहे. त्यामुळे या तीन ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे त्रिग्रही योग बनेल. या योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. तसेच नवीन नोकरी आणि मोठ्या धनलाभाचे योगही तयार होत आहेत. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मकर राशी (Capricorn Horoscope)

तुमच्यासाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या धन आणि वाणीच्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या काळात वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच पैशांशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात आणि जुने व्यवहार सुटण्याची शक्यता आहे. या काळात योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे नशीब अधिक मजबूत करू शकतो. कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंधही अधिक चांगले होतील. तसेच या काळात व्यावसायिकांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात तयार होत आहे. त्यामुळे या काळात नशीब तुमची साथ देईल. तसेच या काळात तुम्ही देश-विदेश प्रवास करू शकता. एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही मिळू शकते. आर्थिक बाबतीत समजूतदारपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला स्वतःमध्ये आधीपेक्षा जास्त सकारात्मक बदल जाणवेल. तसेच विद्यार्थ्यांना या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

तुमच्यासाठी त्रिग्रही योग सकारात्मक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढतील. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जर तुमचा व्यवसाय किंवा काम परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या काळात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. तसेच या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)