Trigrahi Yog in Aries: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करुन त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. अशातच आता २४ एप्रिल २०२४ रोजी ११ वाजून ५८ मिनिटांनी शुक्राने मेष राशीत प्रवेश केलं आहे. जिथे गुरु आणि सूर्य आधीपासून विराजमान आहेत. ज्यामुळे मेष राशीमध्ये शुक्र, सूर्य आणि गुरु यांच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मिथुन राशी

त्रिग्रही योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.

Grah Gochar 2024 June
५ दिवसांनी सूर्यासारखे चमकेल ‘या’ राशींचे भाग्य? ३ तीन मोठे ग्रह बदलणार चाल; नव्या नोकरीसह तुम्हाला कधी मिळणार प्रचंड धनलाभ?
Loksabha election 2024 BJP loss map analysis of BJP performance
भाजपाने कुठे गमावलं, कुठे कमावलं? जाणून घ्या निकालाचा गोषवारा
loksatta kutuhal artificial intelligence for medical diagnostics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोगनिदान चाचण्या
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
Keep your pets fit and active indoors during the heatwave
तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?
Why do flamingos change their way 39 flamingos have died in plane crashes till now
फ्लेमिंगो पक्ष्यांचा मार्गबदल का?
Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
trigrahi shubh sanyog
Trigrahi Yog : १०० वर्षानंतर जुळून येतोय शुभ संयोग, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अपार धनलाभ

कन्या राशी

त्रिग्रही योग बनल्याने जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो. या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. थांबलेली कामे मार्गी लागू शकतात. नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे. एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे.

(हे ही वाचा : ३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा )

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चांगलं स्थळ येऊ शकते. 

मकर राशी

त्रिग्रही योग बनल्याने मकर राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने तुम्हाला या काळात चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)