scorecardresearch

‘त्रिग्रही योग’ बनल्याने ‘या’ राशी होणार धनवान? सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा

Trigrahi Yog In Kumbh: वैदिक ज्योतिषानुसार कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग ३ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

trigrahi yog
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Trigrahi Yog In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ योग तयार करतात. शनिदेवाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि फेब्रुवारीमध्ये सूर्य आणि बुध संक्रमण करतील. ज्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांना त्रिग्रही योग तयार झाल्यामुळे धन आणि प्रगतीचे योग तयार होत आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..

मकर राशी

त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात तयार होईल. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे याकाळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यासह तुम्हाला व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. याकाळात तुम्ही परदेश दौरा करण्याची शक्यता दिसत आहे. तसंच नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने देखील कुठेतरी जावे लागेल.

सिंह राशी

त्रिग्रही योग तयार झाल्याने सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होणार आहे. जी भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. यासोबतच नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला कुठूनतरी नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

( हे ही वाचा: १ महिन्याने तीन ग्रह तयार करणार ‘अद्भुत संयोग’; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा)

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी त्रिग्रही योग शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून दशम स्थानात हा योग तयार होईल. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. यासह, तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. दुसरीकडे, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. यासह नोकरदार लोकांची वेतनवाढ आणि पदोन्नती होऊ शकते. तसेच नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:16 IST
ताज्या बातम्या