Tulsi Vivah date November 2 : या वर्षीचा तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला हा पवित्र सोहळा पार पडतो. या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम (भगवान विष्णूचा अवतार) यांचा विवाह पारंपरिक रीतीने, मंत्रोच्चार आणि श्रद्धेने केला जातो. असे मानले जाते की या दिवशी तुळशीचे कन्यादान केल्याने घरात सुख-समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते.

या वर्षीच्या तुळशी विवाहाला ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहेत आणि चंद्रमा मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र आणि चंद्राचा हा गोचर अत्यंत शुभ मानला जातो आणि त्यामुळे काही राशींच्या जीवनात भाग्याची उजळणी होणार आहे. पाहू या कोणत्या राशींचं नशिब या दिवशी सोन्यासारखं चमकणार आहे.

कन्या राशी

तुळशी विवाहानंतर कन्या राशीवाल्यांसाठी शुभ काळाची सुरुवात होईल. नोकरीत मनासारखी प्रगती, पदोन्नतीची संधी आणि अडकलेली कामं सुटतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. शिक्षण, परदेश प्रवास आणि मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. घरगुती वातावरणात आनंद वाढेल.

तूळ राशी

शुक्र ग्रह तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने तूळ राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. विवाह आणि नातेसंबंधांतील अडथळे दूर होतील, नवीन नाती निर्माण होतील आणि घरात शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल आहे. व्यवसायिकांना नवीन करार मिळू शकतात, तसेच आत्मविश्वासात वाढ होईल.

मीन राशी

मीन राशींसाठी तुळशी विवाहाच्या दिवशी चंद्रमा तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ ठरेल. करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी, नवीन नोकरीचे ऑफर आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे.

या वर्षीचा तुळशी विवाह केवळ धार्मिक नाही तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही शुभ घडामोडींनी भरलेला आहे. शुक्र-चंद्राच्या संयोगामुळे कन्या, तूळ आणि मीन राशींचं भाग्य उजळणार आहे. या दिवशी श्रद्धेनं पूजा आणि कन्यादान केल्यास सुख, समृद्धी आणि सौभाग्याचं आगमन निश्चित आहे.