Mesh To Meen Horoscope, 13 November : आज १३ नोव्हेंबरला कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी आज दुपारी १ वाजून ०२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच बुधवारी वज्र योग ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत जुळून येईल. रेवती नक्षत्र रात्री १ वाजून ११ मिनिटांपर्यंत जागृत असेल. याशिवाय आज प्रदोष व्रत पाळण्यात येणार असून, या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराची पूजा केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तसेच आज राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

तसेच आज तुळशी विवाह सुद्धा पार पडेल. तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असेही मानले जाते. पंचांगानुसार तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त आज संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच तुळशी विवाह नंतर प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते. तर आज तुळशी विवाहाच्या शुभमुहूर्तावर १२ राशींचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेणार आहोत.

Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

१३ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

वृषभ:- नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशन मध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.

सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.

कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

तूळ:- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नवे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:- मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.

धनू:- कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर:- लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.

कुंभ:- कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.

मीन:- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader