Uddhav Thackeray Astrology Predictions Lok Sabha Election 2024: १९ जून १९६६ ला बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, दत्ताजी साळवी या त्या काळातील उमद्या शिलेदारांना घेऊन शिवसेना या पक्षाची स्थापना केली. नोकरी उद्योगधंदा या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना या संघटनेत न्याय मिळेल या अपेक्षेतून विशेषतः गिरणगावातील तरुण मुलांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि खरोखरच त्या कालावधीत सरकारी नोकरी व बँकांमधून नोकरीसाठी एक वेगळीच चळवळ निर्माण झाली. शिवसेना शाखा ते थेट मंत्रालय असा प्रवास साध्या शिवसैनिकांनी केला त्या प्रवाहातच शिवसैनिक तरुणांना राजकारण समजू लागले आणि एके दिवशी एक साधा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.

२०२४ मध्ये ‘या’ महिन्यात शिवसेनेचा प्रभाव परत वाढणार

शिवसेनेचा जन्मच मुळात अमावास्येचा, त्यातही रवीचंद्र ग्रहणयोग पंचमी स्थानी असताना तसेच पराक्रमाचा स्वामी दशमेश मंगळ चतुर्थात राहूसह एकत्र असल्याने शिवसेनेचा प्रवास ज्वलंत, निर्भिड व गनिमी काव्याने शत्रूचे नामोहरम करण्याने सुरु झाला. मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा सुरु होत आहे. या महादशेत निश्चितच शिवसेनेचा प्रभाव पूर्ववत होऊन पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु होईल. साधारण जून २०२४ मध्येच या साऱ्या गोष्टी दिसू लागतील.

Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
PM Narendra Modi and His Horoscope
PM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार? काय सांगते मोदींची कुंडली?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
BJP Maharashtra To Be Washed Out NDA TO Loose In More Than 10 States
महाराष्ट्रासह ‘या’ १० राज्यांत भाजपाचा धुव्वा उडवणार इंडिया आघाडी? सर्वेक्षणातील माहितीत ‘ही’ मोठी चूक

उद्धव ठाकरेंचा घात ‘ही’ माणसंच करू शकतात

उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत नवमात मंगळ, षष्टात केतू, दशमात बुध व लाभ स्थानात रवी हे ग्रह राजकीय स्थितीसाठी अत्यंत मदतीचे ठरतील. चतुर्थात स्वराशीतील गुरु व दशमातील मिथुन राशीतील बुध २०२४ नंतर खऱ्या अर्थाने गतिमान होऊन शिवसेनेचे वर्चस्व वाढीस लागेल. २०२४ लोकसभेतही उमेदवार यशस्वी होतील. यावेळी स्वतःच्या विचाराने पुढे जाणे खूप महत्त्वाचे असेल. अगदी जवळ येणारी माणसे काही वेळा घातक ठरू शकतात त्यामुळे अंतर राखून त्यांच्याकडून कामे करून घ्यावीत.

हे ही वाचा<< PM Modi Astrology : देशात येणारी मंदी मोदींच्या अडचणी वाढवणार? काय सांगते मोदींची कुंडली?

एकनाथ शिंदेंना ‘ती’ पावती मिळणार का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत आलेल्या शुभ ग्रहांनी त्यांना अचानक मुख्यमंत्रीपद मिळवून दिले. पण आता त्यांच्या राशीत आलेल्या कुंभ राशीतील शनी- मंगळ युतीचा २३ एप्रिल २०२४ पर्यंत त्रास होणार आहे. साऱ्या समस्या सोडवताना, अनेकांची समजूत घालताना महायुतीतील अनेकांचे प्रवेश हे ग्रहांइतकेच त्रासदायक असतील. आपल्या आधीच्या पक्षातील लोकांच्या विरोधात उभे राहून यश मिळवणे हे इतके सोपे नाही. खासदार म्हणून हे नेते जेव्हा मतदारांच्या पुन्हा संपर्कात येतात तेव्हा त्यांनी केलेल्या बऱ्या वाईट कामाची पावती ही मतदार देणार असतो. पक्षप्रमुख म्हणून ही जबाबदारी स्वीकारताना या त्रासातून जाण्याची तयारी वेगळी करावी लागते. आता राहूच्या महादशेत शुक्राची अंतर्दशा संमिश्र फळ देईल पण राजकारणातील वर्चस्व कायम राखण्यास शिंदे यशस्वी ठरतील.