Budh Asta In Leo 2024: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. बुध ग्रह मानसन्मान, वाणी, बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे कुंडलीत जर बुध शुभ स्थितीत असेल तर त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. सध्या बुध सिंह राशीत विराजमान असून तो ४ ऑगस्ट रोजी अस्त होणार आहे. बुध ग्रहाच्या अस्त होण्याने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.
बुध ग्रह होणार अस्त (Budh Asta In Leo 2024)
कर्क
बुध सिंह राशीत अस्त होताच त्याचा शुभ परिणाम कर्क राशीच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. या काळात गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात सौख्याचे वातावरण असेल. जुनी कामे पूर्ण होतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होईल. पैश्याची बचत करणं फायदेशीर ठरेल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये हवे तसे यश पाहायला मिळेल. या काळात तुमच्यात साहस, उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होईल.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे अस्त होणे खूप लाभदायी सिद्ध होईल.या काळात समस्यांपासून सुटका होईल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. समाजात मानसन्मान प्राप्त होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी देखील बुधाचे अस्त होणे खूप अनुकूल ठरेल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल. कुटुंबात सुख, शांतीचे वातावरण असेल. तुम्ही आनंदाने प्रत्येक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर व व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात खर्चांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी उत्तम काळ असेल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd