Arun Graha Nakshatra Gochar 2026: नऊ ग्रहांमध्ये अरुण ग्रहाचा समावेश नाही. परंतु ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला युरेनस ग्रह देखील म्हणतात, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत सुमारे सात वर्ष राहतो. अशा प्रकारे, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे ८४ वर्षे लागतात. २०२६ मध्ये अरुण ग्रहाचे राशी परिवर्तन होणार नाही. तो सध्या वृषभ राशीत असून या वर्षात फक्त दोन वेळा नक्षत्र परिवर्तन करेल.
पंचांगानुसार, १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी अरूण ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी कृतिका नक्षत्रात प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल.
अरुण ग्रहाची चाल करणार कमाल
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या लोकांसाठी अरुण ग्रहाची चाल खूप लाभदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धन संपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. अविवाहितांचे लग्न जुळेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या लोकांसाठी अरुण ग्रहाची चाल सकारात्मक मानला जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभू शकते व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशनची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील अरुण ग्रहाची चाल लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. प्रत्येक कामात भरपूर यश मिळवाल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अरुण ग्रहाची चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
