Surya Shukra Dwidwadash Yog 2026: ज्योतिष शास्त्रानुसार, सन्मानाचा कारक सूर्य आणि प्रेमाचा कारक शुक्र यांची युती मानवी जीवनावर खोलवर परिणाम करते. आता हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून ३० अंशांवर येऊन ‘द्विद्वादश दृष्टी योग’ निर्माण करणार आहेत, जो काही राशींसाठी भाग्योदयाचा ठरणार आहे.
ग्रहांच्या गोचरात मे महिना अत्यंत खास ठरणार आहे. सन्मान आणि यशाचा कारक असलेला सूर्य आणि प्रेम, समृद्धी अन् ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र एका शक्तिशाली योगाची निर्मिती करत आहेत. ‘द्रिक पंचांग’नुसार, ११ मे २०२६, सोमवार रोजी पहाटे ०२:५१ वाजता सूर्य आणि शुक्र एकमेकांपासून ३०° अंतरावर येतील, ज्यामुळे ‘द्विद्वादश दृष्टी योग’ जुळून येईल. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि त्याचा प्रभाव साधारणपणे १ ते २ आठवडे जाणवू शकतो. या शुभ योगामुळे कोणत्या ४ राशींना बंपर लॉटरी लागणार आहे ते जाणून घेऊया…
वृषभ राशी
सूर्य-शुक्राचा हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदलांची नांदी ठरेल. घराची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल. कामाच्या ठिकाणी मोठे पद किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधींचा असेल, परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ जीवनात स्थिरता घेऊन येईल. प्रेमसंबंधांमधील दुरावा दूर होऊन गोडवा वाढेल. दीर्घकाळापासून असलेला मानसिक तणाव कमी होईल आणि नोकरीतील अडथळे दूर होतील. समाजात अपेक्षेपेक्षा जास्त मानसन्मान मिळेल.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग अपार यश देणारा ठरेल. व्यावसायिकांना एखादी मोठी आणि फायदेशीर डील मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, त्यामुळे नवीन नोकरी मिळवण्यात यश येईल.
तूळ राशी
तूळ राशीच्या व्यक्तींना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील आणि उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. तसेच, कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांचा नोकरीचा शोध आता संपू शकतो.
ज्योतिषशास्त्रातील हा योग अत्यंत दुर्मिळ असून, यादरम्यान केलेल्या गुंतवणुकीचा भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो.
