Vaidhruti Yoga 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात काही योग शुभ मानले जातात, तर काही योगांचा प्रभाव अशुभ मानला जातो. असाच एक योग म्हणजे वैधृती योग. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे हा योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आर्थिक व्यवहार, नोकरी-व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात काही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दृक पंचांगानुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे वैधृती योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाचा वृषभ, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ या पाच राशींना प्रतिकूल परिणाम जाणवू शकतो. कोणत्या राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
१. वृषभ राशी (Taurus Zodiac)
वैधृती योगाचा वृषभ राशीच्या व्यक्तींवर प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या काळात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते. व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. खर्च वाढल्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
२. तूळ राशी (Libra Zodiac)
तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. व्यवसायात अपेक्षित नफा न मिळाल्याने निराशा येऊ शकते. कोणत्याही नवीन गुंतवणुकीचा निर्णय घाईघाईने घेऊ नका. पैशांचे व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्या. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही कामाचा ताण जाणवू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळल्यास संभाव्य अडचणी टाळता येतील.
३. वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च वाढण्याची किंवा पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या.
४. मकर राशी (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या व्यक्तींना वैधृती योगाच्या काळात नोकरी आणि व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार वर्गावर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत मतभेद होऊ नयेत, याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात. व्यावसायिकांना अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घ्या आणि आर्थिक व्यवहार करताना घाई टाळा.
५. कुंभ राशी (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या बाबतीतही निष्काळजीपणा करू नका. आर्थिक किंवा कौटुंबिक विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करण्याऐवजी शांतपणे विचार करा.
