Rashi Bhavishya 18 April 2026 In Marathi : आज १८ एप्रिल २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. त्याचबरोबर दुपारी १० वाजून २८ मिनिटांपर्यंत प्रीती योग जुळून येईल. दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ४ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजून ७ मिनिटांनी सुरु होईल ते १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर शनीवार तुमच्या राशीसाठी कसा असणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १८ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 18 April 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडीवर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर