Daily Horoscope 14 February 2026 In Marathi : आज १४ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असणार आहे. चतुर्थी तिथी बुधवारी १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु झाली असून आज रात्री १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येईल आणि पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज व्हॅलेंटाईन डे असणार आहे. तुमच्या राशीचा दिवस प्रेमळ जाणार का जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १४ फेब्रुवारी २०२६ (Rashi Bhavishya 14 February 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर