Varuthini Ekadashi 2024: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी वरुथिनी एकादशी ०४ मे रोजी येत असून या दिवशी शुभ योग तयार होत आहेत. वरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि वैधृती योग तयार होत आहेत. या तीन योगांच्या निर्मितीमुळे चार राशींच्या लोकांना भगवान विष्णूच्या कृपेने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मेष राशी

वरुथिनी एकादशीला तीन शुभ योगाच्या निर्मितीमुळे मेष राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या नोकरदारांना चांगली वेतनवाढ मिळू शकते. व्यवसाय वाढवता येईल आणि भरघोस नफा मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मिथुन राशी

वरुथिनी एकादशीला तीन शुभ योग तयार होत असल्याने मिथुन राशीच्या लोकांवर श्री हरीच्या आशीर्वादाचा वर्षाव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात मोठा लाभ होऊ शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(हे ही वाचा : १ मे पासून सिंहसह ‘या’ ५ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी देवगुरु दोन वेळा चाल बदलताच होऊ शकतो मोठा धनलाभ )

कन्या राशी

वरुथिनी एकादशीला तीन शुभ योगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुम्हाला मोठी डील मिळू शकते. नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये काही बदल दिसू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशी

वरुथिनी एकादशीला तीन शुभ योग तयार होत असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही खूप दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला उत्तम संधी मिळू शकते. पैसे मिळवण्यासाठी तसेच तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला नक्की यश मिळण्याची अपेक्षा आहे. समाजात मान-सन्मानात वाढ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)