Aajche Rashi Bhavishya 23 january 2026 In Marathi : आज २३ जानेवारी २०२६ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. त्याचबरोबर परीघ योग जुळून येईल आणि भाद्रपदा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल. आज वसंत पंचमी असणार आहे. यंदा वसंत पंचमीला ग्रहांचे खूप शुभ संयोग जुळून येत आहेत. त्यामुळे, मोठ्यांसोबतच लहान मुलांनीही या दिवशी पूर्ण विधी-विधानाने सरस्वती देवीची पूजा करावी. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, २३ जानेवारी २०२६ (Daily Horoscope In Marathi 23 january 2026 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

प्रेमसंबंध सुधारतील. करमणुकीवर भर द्याल. सर्वांशी आनंदाने वागाल. घरातील कामाची दगदग जाणवेल. जवळचे नातेवाईक भेटतील.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

सर्व बाबी चांगल्याप्रकारे जाणून घ्याल. चर्चेत आवडीने भाग घ्याल. तांत्रिक कामात प्रगती कराल. भावंडांना कामात मदत कराल. सामाजिक जाणीवेतून कामे कराल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

मध्यस्थीचे काम कराल. व्यावहारीक बुद्धिमत्ता वापरावी. बोलताना भान विसरू नये. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

तत्परतेने कामे कराल. फार चिकित्सा करू नका. भावनिक विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. सुसंगत शब्दांची जोड घ्यावी.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

आपला रुबाब दाखवाल. धीटपणे वागाल. मागचापुढचा विचार करावा लागेल. खर्चाचे भान राखावे. दृढनिश्चय करावा.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

वादात अडकू नये. काही गोष्टी योग्यवेळीच बोलाव्यात. क्षणिक गोष्टींचा लाभ घ्याल. गैरसमजुतीमुळे मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

चांगला आर्थिक लाभ होईल. तुमचा मान वाढेल. सामाजिक कामात रस घ्याल. मौल्यावान वस्तू खरेदी कराल. कष्टावर अधिक भर द्याल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

सामाजिक दर्जा उंचावेल. सत्तेचा अधिकार गाजवाल. महत्त्वकांक्षा वाढीस लागेल. विरोधकांकडे लक्ष द्यावे. निषेध दर्शविताना विचार करावा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

इतरांपुढे आदर्श ठेवाल. स्वभावात मानीपणा आणू नये. सतत खटपट कराल. प्रवासात काळजी घ्यावी. मानापमानाच्या प्रसंगात अडकू नका.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. तब्येतीची हयगय करू नका. हातातील कामात चिकाटी धरून ठेवावी लागेल. पोटाचे विकार जाणवू शकतात.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)

ठाम निश्चय कराल. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराला लाभ होईल. क्षुल्लक कारणांकडे दुर्लक्ष करावे. भागादारीतील मतभेद दूर करावेत.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)

कामाचा उरक वाढेल. हातात काही अधिकार येतील. कार्यपद्धतीत बदल कराल. मुलांना कामात मदत कराल. सकारात्मक विचार करावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर