Where To Keep Tortoise Vastu Shastra: घराचे प्लॅनिंग आणि डिझाइन करताना, रंग, थीम, डेकोर सर्व काही तज्ज्ञांकडून घेण्यावर आपला भर असतो. अर्थात सध्याच्या घराच्या किमती पाहता आपण प्रचंड कष्टाने घेतलेलं घर परफेक्ट असावं असं प्रत्येकाला वाटतं. घराचे डिझाईन करताना वास्तूशास्त्राचे नियम सुद्धा पाळणे महत्त्वाचे ठरते. आज आपण असाच एक वास्तुशास्त्र नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांच्या घरात कासवाची मूर्ती असते. काच किंवा धातूंचे कासव घरात नेमके कोणत्या ठिकाणी असावे व त्यामुळे साधारपणे घरावर व घरातील सदस्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. दिव्यवास्तु अल्केमी वास्तु कन्सल्टिंगच्या मालक दिव्या छाबरा यांनी यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या छाबरा सांगतात की, कासव हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे “आपल्या सर्वांना माहित आहे की भगवान विष्णू जिथे जातात तिथे त्यांच्या मागे लक्ष्मी किंवा संपत्तीची देवी येते. कासव साधारणपणे १२५-१५० वर्षे जगत असल्याने ते दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. अंकशास्त्रज्ञ लविना श्रीमल यांनी देखील अलीकडेच वास्तूनुसार घरात कासवाच्या मूर्तींचे स्थान कुठे असावे याची माहिती दिली आहे.

धनलाभासाठी घरात कासवाची मूर्ती कुठे असावी?

  • चांदीचे कासव : उत्तर/उत्तर पश्चिम; व्यवसायाची वाढ आणि पैशाचा प्रवाह वाढू शकतो
  • पितळेचे कासव : दक्षिण पश्चिम; नाते आणि प्रेम सुधारण्याची संधी
  • लाकडाचे कासव : ईशान्य; चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य, नशिबाची साथ
  • क्वार्ट्स/काचेचे कासव : पूर्व किंवा दक्षिण पूर्व; नकारात्मक ऊर्जा कमी करते

छाब्रा यांनी कासवाच्या मूर्तीबाबत सांगितलेल्या टिप्स

  • कासवाची मूर्ती उत्तरेकडे तोंड करून घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्यास इच्छापूर्ती होण्यास मदत होऊ शकते. तसेच ही मूर्ती कार्यालयात ठेवल्यास, यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.
  • ज्यांना संपत्तीच्या स्थिरतेचा त्रास होतो त्यांनी दक्षिण-पश्चिम दिशेला पितळी कासव ठेवणे उत्तम ठरू शकते, उत्तर दिशेला कासवाचे तोंड असावे.
  • घराच्या दक्षिण-पश्चिम झोनमध्ये पितळी कासव ठेवल्यास, प्रेम व कौटुंबिक सुख लाभू शकते.

हे ही वाचा<< गुरुदेव गोचर करून ‘या’ ५ राशींच्या नशिबाला देणार कलाटणी? ‘या’ दिवसापासून अमाप धनलाभाची संधी

  • पश्चिमेकडे तोंड करून अभ्यासाच्या टेबलावर पितळी कासव ठेवल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
  • घराच्या मध्यभागी ठेवलेल्या उत्तराभिमुख कासवाची मूर्ती संयम आणि चिकाटी वाढवण्यास मदत करते.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu shastra home decor where to keep tortoise murti at home to get more money astrology news today svs
First published on: 20-03-2023 at 11:00 IST