Vastu Shastra Tips : वास्तुशास्त्रात केवळ घराची दिशाच सांगितली जात नाही तर घरात कोणत्या वस्तू कुठल्या दिशेने असणे गरजेचे आहे हेही सांगितले जाते. याच वास्तुशास्त्रात घरात बूट आणि चप्पल कोणत्या दिशेने आणि कुठे ठेवावेत याबाबतही काही नियम सांगितले आहेत. तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी बूट आणि चपला काढत असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, ज्यामुळे गरिबी, तणाव आणि अशांतता निर्माण होऊ शकते. वास्तुमध्ये कोणत्या ठिकाणी बूट आणि चप्पल ठेवणे अशुभ मानले जाते आणि ते कसे टाळावे ते जाणून घेऊया.
घरात कोणत्या जागी चपला, बूट काढू नये?
१) मुख्य प्रवेशद्वाराजवळ
वास्तुशास्त्रात, मुख्य दरवाजा हा घरातील संपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. मुख्य दरवाजाजवळ, विशेषतः बाहेर किंवा अगदी समोर, बूट आणि चपला ठेवत असल्यास नकारात्मक ऊर्जा घरात येते. यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो, ज्यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, गरिबी येऊ शकते. वास्तुनुसार मुख्य दरवाजापासून दूर शू रॅकमध्ये बूट, चपला व्यवस्थित ठेवा, जेणेकरून घरात शुभ, आनंददायी वातावरण राहील.
२) पूजेची जागा
पूजेची जागा ही घरातील सर्वात पवित्र स्थान मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या जागेजवळ बूट आणि चप्पल काढणे अशुभ मानले जाते. यामुळे जागेची पावित्र्यता भंग होते आणि कुटुंबात आर्थिक समस्या आणि मानसिक अशांतता वाढू शकते, त्यामुळे मंदिरात गेल्यानंतरही मंदिरापासून दूर तुमच्या चपला काढाव्यात.
३) स्वयंपाकघर
स्वयंपाकघर हे घरातील समृद्धीचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे, जिथे आई अन्नपूर्णेचा निवास असतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघराजवळ आत किंवा आजूबाजूला बूट आणि चपला काढणे अशुभ मानले जाते. बूट घाण आणि नकारात्मक ऊर्जा आणतात, ज्यामुळे स्वयंपाकघराच्या शुद्धतेवर परिणाम होतो. यामुळे कुटुंबात पैशाची कमतरता, अन्नाची नासाडी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. बूट आणि चप्पल स्वयंपाकघरापासून पूर्णपणे दूर ठेवाव्यात.
४) बेडरूम
वास्तुशास्त्रात बेडरूमला शांती आणि विश्रांतीचे ठिकाण मानले जाते. बेडरूममध्ये किंवा बेडखाली बूट आणि चप्पल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. बूट बाहेर रॅकमध्ये ठेवा.