Vastu Tips For New Home : नवीन घर बांधताना किंवा घेताना आधी वास्तूशास्त्रातील नियमानुसार घेतले जाते. मग घराचा दरवाजा, किचन अशा अनेक गोष्टी कोणत्या दिशेन असाव्या हे पाहिले जाते. कारण यावर घरातील सकारात्मक- नकारात्मक ऊर्जा अवलंबून असते. जर घरातील काही गोष्टी चुकीच्या दिशेने असतील तर त्याचा घरात नकारात्मक परिणाम जाणवतो. त्यामुळे घरातील सुख, शांती, समाधानासाठी वास्तू नियम पाळणे गरजेचे आहे.
१) घराचा मुख्य दरवाजा
घर खरेदी करताना मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावा याची खात्री करा. शिवाय तुमच्या घरासमोर इतर कुणाच्या घराची शिडी किंवा गेट नसावा. तसेच मेन दरवाजातून पुरेसा प्रकाश घरात यायला हवा. या प्रकारचे तुमचा मुख्य दरवाजा असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाहून नेण्यास मदत होते.
२) बेडरूम कोणत्या दिशेला असावी?
घर खरेदी करताना मास्टर बेडरूमची दिशा विचारात घेतली पाहिजे. वास्तुनुसार, बेडरूमची दिशा नैऋत्येकडे असावी. यामुळे बेडरूममध्ये शांत वातावरण निर्माण होते आणि घरात समृद्धी येते. तसेच घरात राहताना कधीही तुमच्या बेडच्या अगदी समोर आरसा ठेवू नका, असे केल्याने नकारात्मकता पसरू शकते.
३) स्वयंपाकघर
घर बांधताना किंवा नवीन घरात जाण्यापूर्वी स्वयंपाकघर कोणत्या दिशेने आहे ते नेहमी तपासा. स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असल्यास अशुभ परिणाम होऊ शकतात. वास्तुनुसार, स्वयंपाकघर नेहमीच आग्नेय दिशेने असले पाहिजे. याचा कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो.
४) बाथरूम आणि टॉयलेट
नवीन घरात शिफ्ट होण्यापूर्वी बाथरूम आणि टॉयलेट कोणत्या दिशेने आहे याचा विचार करा. वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम आणि टॉयलेट नेहमी वायव्य दिशेला असावे. ईशान्य दिशेला ते बांधणे अयोग्य मानले जाते. शिवाय टॉयलेट आणि बाथरूम चांगले हवेशीर असले पाहिजेत आणि त्यांचे दरवाजे नेहमी बंद असले पाहिजेत.
५) पूजास्थान किंवा देवघर
देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. म्हणून देवारा योग्य दिशेने असणे अत्यंत महत्वाचे आहे. वास्तुनुसार, देवारा नेहमी ईशान्य किंवा पूर्व दिशेने असले पाहिजे. याव्यतिरिक्त, देवाऱ्याच्या आतील भाग हलक्या आणि शांत रंगांनी रंगवावा हे खूप शुभ मानले जाते. देवारा कधीही बाथरूम किंवा स्वयंपाकघराजवळ ठेवू नये.
