Vastu Tips For Home In 2025 : वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू ठेवण्याआधी वास्तूचे नियम जाणून घेतले पाहिजेत. तुम्ही पाहिले असेल की, अनेक जण घर बांधताना किंवा खरेदी करतानाही आधी वास्तुशास्त्रातील नियम पाहतात. जर वास्तुशास्त्रानुसार घराची रचना नसेल, तर घरात नकारात्मकता पसरू शकते अन् घरातील लोकांचे आरोग्य बिघडू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, वास्तुशास्त्रात अशा अशा काही मूर्ती आणि वस्तूंचे वर्णन आढळते की, ज्या घरात ठेवल्यास नवचैतन्य, संपन्नतेचे वातावरण निर्माण होते. इतकेच नव्हे, तर घराचे सौंदर्य आणखी वाढते. या मूर्ती योग्य जागी ठेवल्यास सौभाग्य मिळते, प्रगती व आर्थिक विकास साधताना अडचणी येत नाहीत. तेव्हा वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊ की, कोणत्या मूर्ती घरात ठेवल्याने आनंद, सुख-समृद्धी नांदू शकते.

तांबे, पितळ किंवा चांदीची हत्तीची मूर्ती

हत्तीवर देवी लक्ष्मीचे विशेष कृपाशीर्वाद आहेत. वास्तूनुसार, बेडरूममध्ये चांदीची हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहूशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहू शकते. घरात चांदीची हत्तीची मूर्ती ठेवल्याने सुख, शांती, संपत्ती व समृद्धी नांदते. कारण- हत्तीला संपत्तीचे प्रतीक मानले जाते.

कासवाची मूर्ती

वास्तुशास्त्रात कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. म्हणून घरी कासव पाळल्याने संपत्ती वाढू शकते. तसेच, घरातील लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू शकते. त्यासाठी तुम्ही घराच्या ड्रॉईंग रूममध्ये पूर्व आणि उत्तर दिशेने कासवाची मूर्ती ठेवू शकता. पण लक्षात ठेवा की, कासवाचे तोंड घराच्या आतील बाजूस असले पाहिजे.

गाईची मूर्ती

घरात गाईची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण- हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून जीवनातील भौतिक गोष्टीच्या प्रतीक्षेत असलेल्या जोडप्याने घरात गाईची मूर्ती बसवणे शुभ मानले जाते. तसेच, वास्तूच्या अशुभ प्रभावांपासून आराम मिळतो. त्यामुळे घरात धन, धान्याची कमतरता भासत नाही.

उंटाची मूर्ती

जर तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये समस्या येत असतील, तर तुम्ही घराच्या ड्रॉईंग रूम किंवा लिव्हिंग रूमच्या वायव्य दिशेला उंटाची मूर्ती ठेवू शकता. असे केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वाढत्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होण्यास मदत होते.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)