आपल्या जवळच्या किंवा खास व्यक्तीला भेट म्हणून सोने देणे ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि दिवसेंदिवस हा ट्रेंड अधिकाधिक वाढत आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून काय द्यावे हे समाजात नाही तेव्हा आपण सोन्याच्या वस्तू भेट म्हणून देण्याचा विचार सर्रास करतो. पण सोने भेट म्हणून देण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. चला जाणून घेऊया हे फायदे आणि तोटे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भेट म्हणून सोन्याचे दागिने देण्याचे फायदे

सोन्याचे दागिने भेट देण्याबाबत असे म्हटले जाते की, जर तुम्ही एखाद्याला पैसे दान केले तर त्याचे फळ तुम्हाला एकदाच मिळते. पण सोने, जमीन, मुलगी दान केल्याने माणसाला सात जन्म त्याचे फळ मिळते. त्यामुळे कोणाला काही दान करायचे असेल तर सोन्याचे दागिने द्यावेत.

सोने दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव दिसून येतो. पण ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याचे दान करायचे असेल तर ग्रहांची स्थिती चांगली असली पाहिजे.

सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत

अशा स्थितीत सोने दान करा

ज्योतिष शास्त्र सांगते की जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह शुभ फल देत नसेल तर व्यक्तीला धार्मिक पुस्तके, सोने, पिवळे कपडे, केशर इत्यादी भेटवस्तू दान करणे फायदेशीर आहे.

या लोकांचे नुकसान होते

असे म्हटले जाते की ज्या लोकांची कुंडली आधीच शुभ आहे किंवा शुभ फल देत आहे त्यांनी सोने दान करू नये. असे करणे त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते. यासोबतच ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की कुंडलीत गुरूची स्थिती पाहूनच तुम्ही स्वतः सोने परिधान करा. अन्यथा नुकसान होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips here are some important rules to know before giving gold as a gift otherwise damage may occur pvp
First published on: 24-06-2022 at 11:40 IST