वास्तुशास्त्रात काही गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात. ज्या घरात राहिल्याने अनेक वास्तुदोष दूर होतात. या शुभ चिन्हांमध्ये गणपतीच्या मूर्तीला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. श्रीगणेश प्रसन्न झाले तर जीवनात दुःख येत नाही. जीवनात अपार सुख आणि समृद्धी लाभते. त्यामुळे घरामध्ये श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी, परंतु यासाठी यादरम्यान वास्तुशास्त्रातील सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरामध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्ती योग्य दिशेने ठेवली जावी याची विशेष काळजी घ्यावी. गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी घराचा ईशान्य कोपरा ही उत्तम दिशा आहे. येथे गणपतीची मूर्ती ठेवणे शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा निवडा. मात्र चुकूनही श्रीगणेशाची मूर्ती दक्षिणेला बसवू नका. देवतांच्या पूजेसाठी ही दिशा अशुभ मानली जाते. तसेच, ज्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, त्याठिकाणी आजूबाजूला अस्वच्छता नसावी, कचरा किंवा शौचालय नसावे, हेही लक्षात ठेवावे.

‘या’ राशीच्या मुलांना पाहता क्षणीच त्यांच्या प्रेमात पडतात मुली; लग्न करण्यास असतात उत्सुक

मूर्तीची प्रतिष्ठापना करताना लक्षात ठेवा की मूर्ती मातीची, शेणाची किंवा धातूची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा काचेची मूर्ती कधीही ठेवू नका. देवतांच्या मूर्ती नेहमी शुद्ध धातूच्या किंवा मातीच्या शेणाच्या असाव्यात. तरच ते घरात सुख-समृद्धी आणतात.

घरात भांडणे होत असतील, आर्थिक नुकसान होत असेल, जीवन संकटांनी घेरले असेल तर त्यामागे घरातील वास्तुदोष हे प्रमुख कारण असू शकते. अशा स्थितीत घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वर किंवा प्रवेशद्वारासमोर, गणपतीच्या दोन मूर्ती किंवा चित्र अशा प्रकारे ठेवावे की दोन्हीच्या पाठी एकमेकांना चिकटलेल्या असतील.

‘अशा’ स्वभावाच्या मुली ठरतात उत्तम पत्नी आणि सून; जाणून घ्या चाणक्य नीती काय सांगते

यासह, एका मूर्तीमध्ये किंवा चित्रात, गणपतीचे मुख घराच्या आतील बाजूस आणि दुसरे बाहेरील दिशेने असावे. मूर्ती किंवा फोटो समान आकाराचा असावा हे लक्षात ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर होतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips the idol of lord ganesha should be placed in this direction in the house there will be a shower of wealth pvp
First published on: 27-05-2022 at 14:40 IST