Premium

Vat Purnima 2023: या वर्षी केव्हा आहे वटपौर्णिमा? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्त्व

देशात काही ठिकाणी वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला साजरी केली जाते तर काही ठिकाणी पौर्णिमेला साजरी केली जाते.

Vat Purnima 2023
या वर्षी केव्हा आहे वटपौर्णिमा? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Vat Purnima 2023: वटपौर्णिमा हा नवरा-बायकोच्या पवित्र नात्याचा खूप मोठा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पती किंवा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. याच पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाच्या खाली सत्यवानाचे प्राण परत आणले होते. या दिवसाची आठवण म्हणून विवाहित महिला पतीला भरपूर आयुष्य लाभावे, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे? आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व आणि शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे?

देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी आणि मुहूर्तावर वटपौर्णिमा साजरी केली जाते. काही ठिकाणी वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला साजरी केली जाते तर काही ठिकाणी पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे.

(हे ही वाचा: Chandra Grahan 2023 : वर्षातील दुसरं चंद्रग्रहण केव्हा आहे माहित्येय का? जाणून घ्या वेळ आणि भारतात ते दिसणार का?)

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजता सुरू होणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. या शुभ मुहूर्तादरम्यान तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता.

वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व

वटपौर्णिमा व्रत हे विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. अविवाहित मुलीसुद्धा चांगला पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी नांदते. पतीचं आयुष्य वाढतं. पती संकटातून मुक्त होतो. एवढंच काय तर संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 10:21 IST
Next Story
३० वर्षांनी शश राजयोग बनल्याने शनी महाराज देणार श्रीमंती? ‘या’ राशी होऊ शकतात कोट्याधीशांच्या मालक