Vatpurnima Rashi 2026: हिंदू पंचांगातील ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस देशभरात ‘वटपौर्णिमा’ म्हणून अतिशय उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. यंदा वटपौर्णिमा सोमवार, २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. ज्योतिषशास्त्रातही हा दिवस अत्यंत खास मानला जाणार आहे,ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या लोकांवर होईल.
वटपौर्णिमेचा दिवस या राशींचे नशीब बदलणार
मेष (Mesh Rashi)
ज्येष्ठ पौर्णिमाचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींना ज्येष्ठ पौर्णिमाचा दिवस खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
तूळ (Tula Rashi)
ज्येष्ठ पौर्णिमाचा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.
धनु (Dhanu Rashi)
ज्येष्ठ पौर्णिमाचा दिवस धनु राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
